भन्नाट रानवारा, मस्तीत शीळ घाली, मस्तीत शीळ घाली…
खरंच डोंगर दऱ्यांतून जाणाऱ्या या राजाने असे काही झपाटून टाकले की मन त्या वाटांकडे वळले आणि जन्म झाला “रानवाटा” या यात्रेचा… ज्यांच्या साक्षीने शिवशाही अवतरली त्यांना मानाचा मुजरा करण्याकरिता आम्ही “रानवाटा” हि एक आनंदयात्रा घेऊन आलो आहोत.
“रानवाटा” हा काही एखादा उपक्रम नव्हे जो फक्त माहितीसदृश्य असेल तर ती आहे नाळ, निसर्गाला जोडणारी, त्याच्या अद्वितीय रुपात लीन होणारी… तर अशाच अनुभवांना सामोरे जाण्याकरता तयार व्हा…